Maharashtra247

हरेगाव प्रकरणामधील आरोपींना अटक करून त्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात रीपाईच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

राहुरी प्रतिनिधी (दि.१६ सप्टेंबर):-जिल्ह्यातील श्रीरामपूर तालक्यात हरेगाव प्रकरणामधील आरोपींना अटक करून त्या गलांडे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी दि.१५ सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात,जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन,विभागीय प्रमुख भीमराज बागुल,युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे,उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष रमाताई धीवर, तालुका अध्यक्ष सुनील शिरसाठ,शहराध्यक्ष विजय पवार,जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड,मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड,उपाध्यक्ष सुरेश जगताप,योगेश बनसोडे, तालुका संघटक संजय बोरगे, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर,तालुका उपाध्यक्ष मोजेस चक्रनारायण,तालुका सरचिटणीस हितेश पवार, महिला आघाडीच्या स्नेहलताई दिवे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page