गणपती विसर्जन मार्गाची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक मुंडे यांनी केली पाहणी;गणेशोत्सव मंडळांना केल्या महत्त्वाच्या सूचना
अहमदनगर (दि.१६ सप्टेंबर):-दि.१९ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जातो.
गणेशोत्सव अनुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती विसर्जन मार्गाची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे केली पाहणी व मिरवणूक मार्गातील येणाऱ्या अडथळ्या संदर्भात मंडळाच्या सदस्यांना योग्य त्या केल्या.यावेळी हद्दीतील गणपती विसर्जन मार्गाची सहा.पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे,शांतता समिती सदस्य श्री.संतोष बोबडे,श्री.रिजवान शेख,श्री.शामराव वाघस्कर,दिपक लिपारे,कॅटोनमेंट अधिकारी श्री.दत्ता फुलारी,सतिष मगर,महावितरण कंपनीचे श्री.आबा परभणे,गोपनिय पोलीस अंमलदार पोहेकॉ/अजय गव्हाणे,पोहेकॉ/संदिप घोडके,पोना/दीपक शिंदे,पोना/धोंडे यांचे सह पाहणी करुन त्यांना आगामी गणेश विसर्जनचे अनुषंगाने मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजविणे,स्ट्रिट लाईट चालु करणे,बॅरेकेटींग करणे,या व इतर महत्वाच्या सुचना दिल्या व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी केले.