Maharashtra247

भारतरत्न डॉ.बाबासाहेब बहुउद्देशीय प्रतिष्ठान (ट्रस्ट) कॅम्प कौलारू सर्जेपुरा यांच्या वतीने व स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर महात्मा फुले जण आरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजने अंतर्गत सर्वरोग निदान शिबीर सर्जेपुरा येथे संपन्न

अहमदनगर (दि.१६ सप्टेंबर):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब बहुउद्देशीय प्रतिष्ठान (ट्रस्ट) कॅम्प कौलारू सर्जेपुरा यांच्या वतीने व स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर महात्मा फुले जण आरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजने अंतर्गत सर्वरोग निदान शिबीर आज दि.१६ सप्टेंबर रोजी कॅम्प कौलारू सर्जेपूर येथे पार पडले.

प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संखेने या शिबिरात सहभाग घेतला.स्वास्थ्य हॉस्पिटलचे डॉ.शिरीष गायकवाड,राजेंद्र गोलंडे,ज्योती चकने,पीआरओ अमित शिरसाठ ब्रदर-निलेश डवणी,अमोल गमरे यांचे शिबिरात विशेष सहकार्य लाभले.तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे मार्गदर्शक राजेश बनसोडे,अध्यक्ष विशाल गायकवाड,तुकाराम गायकवाड,अमोल गायकवाड,समीर नायक,विकी गायकवाड, विरेश बनसोडे,मोहित मोरे, अजय काळे,मोनू गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page