रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक शासकीय सुभेदारी विश्रामगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षप्रमुख राजूभाई साबळे उपस्थित होते. आगामी ऑक्टोबर महिन्यात नियोजित असलेल्या भव्य शहर-जिल्हा मेळाव्याची पूर्वतयारी, पक्षाची संघटनात्मक बांधणी,विविध आघाड्यांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या जनहिताच्या प्रश्नांवर या वेळी सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात येऊन पक्षविस्ताराचा निर्धार व्यक्त करण्यात आला.या चिंतन बैठकी दरम्यान नारायण सपकाळ आणि मुजीब पटेल यांनी पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे सांगत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाची पाळेमुळे तळागाळात रुजवून जनतेच्या हक्कांसाठी अधिक आक्रमक व प्रभावीपणे लढा देण्याचा संकल्प या बैठकीत एकमुखाने करण्यात आला.या वेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा विधिज्ञ अॅड.अविनाश थिट्टे,राज्य सचिव सुरेश नाना शिनगारे,राज्य सहसचिव वैभव लोखंडे,मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे, कामगार आघाडी जिल्हाप्रमुख सुरेश कांबळे,शहर अध्यक्ष रणजीत मनोरे,जिल्हा सरचिटणीस रवी मोरे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे,कामगार आघाडी शहर अध्यक्ष संतोष उनवणे, मध्य शहर अध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे, रिक्षा चालक-मालक आघाडी अध्यक्ष प्रदीप धनेधर,चित्रपट आघाडीचे टी.शाम सुंदर, राहुल अंकुशे, शहर उपाध्यक्ष सतीश प्रधान, शेख फईम, विजय सदावर्ते, कडूबा म्हस्के, शेख रफीक यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे यांनी केले.
