Maharashtra247

शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर डीवायएसपींच्या पथकाचा छापा ६ लाख २० हजार रुपये किंमतीचे गोमांस जप्त;शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह? नुसता मलिदा गोळा करण्यातच व्यस्त

संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर बुधवारी दि.११ रोजी पहाटे 5.30 वाजता छापा टाकला.

या कारवाईत 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचे गोमांस जप्त केले असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील जमजम कॉलनीमध्ये बेकायदेशीर कत्तल खान्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने जमजम कॉलनी परिसरातील नवाज कुरेशी व जब्बार पटेल यांच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकला.पोलिसांनी या कत्तलखान्यातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे गोमांस तसेच 50 हजार रुपये किंमतीची हिरव्या रंगाची ओमनी कार व 40 हजार रुपयांचे गोवंश जनावरांचे मांस असा 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर पोलिसांनी त्याच कॉलनीत बेकायदेशीरित्या सुरू असणार्‍या वहीद कुरेशी याच्या कत्तलखान्यावर छापा टाकून 2 हजार किलो सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे गोमांस जप्त केले.याप्रकरणी पोलीस नाईक शामराव हासे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवाज कुरेशी, जब्बार पटेल आणि वाहीद कुरेशी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.कत्तलखाने सुरूच असल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.नुसता मलिदा गोळा करण्यात व्यस्त असल्यामुळे शहरात चोऱ्या,घरफोड्या,अवैध धंदे बोकाळले आहे पोलीस निरीक्षक साहेबांनी यात वेळीच लक्ष घालून याला आळा बसवला पाहिजे अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

You cannot copy content of this page