मिशन आपुलकी अंतर्गत जि.प.शाळा हंडेवाडी शाळेस संगणक व लाऊडस्पीकर संच भेट
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-मिशन आपुलकी अंतर्गत जि.प.प्रा.शाळा हंडेवाडी ता.कोपरगाव येथे पालक मेळावा आयोजीत केला होता.
या मेळाव्यात मुख्याध्यापक रामेश्वर चत्तर यांनी सर्व पालक व शिक्षणप्रेमी व्यक्तींना शैक्षणिक गुणवत्तेस पुरक सुविधा पुरविण्याचे आवाहन केले होते.त्यास सकारात्मक प्रतिसाद देत विठ्ठल श्रीपत घुमरे यांनी एसर कंपनीचा डेस्कटॉप संगणक भेट दिला.ज्ञानेश्वर तुळशीराम शेळके यांनी शाळेला एक पोर्टेबल लाऊडस्पीकर संच भेट दिला,तसेच अन्य पालक हे एकत्र येऊन BALA उपक्रमांतर्गत शालेय परिसरीतील भिंतीवर पुन्हा नव्याने रंगकाम करून अभ्यासपूरक माहीतीचे लेखन करण्यासाठी योगदान देणार आहेत.
शाळेच्या वतीने सदर संगणक व लाउडस्पीकर शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर चत्तर यांनी स्विकारला. ग्रामस्थ व पालकांच्या उपस्थितीत देणगीदारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.सुत्रसंचालन शिक्षक ज्ञानेश्वर सांबरे यांनी केले.