Maharashtra247

महानगरपालिका हद्दीत अतिक्रमणे हटविण्यासाठी मनपा राबवणार विशेष मोहीम; विशेषतःपान टप-या,शाळा, कॉलेज,शैक्षणीक संस्था यांच्या परिसरातील सर्व प्रकारचे कच्चे पक्के अतिक्रमणे,टप-या,शेड,हातगाडया इत्यादी हटविण्यात येणार

अहमदनगर (दि.१२ ऑक्टोबर):-अहमदनगर महानगरपालिका हद्दीत अतिक्रमणे हटविणे संदर्भात मनपा आयुक्तांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.यामध्ये शाळा, कॉलेज,शैक्षणीक संस्था यांचे परिसरातील सर्व प्रकारची कच्चे पक्के अतिक्रमणे, टप-या,शेड,हातगाडया इत्यादी हटविण्यात येणार आहेत.या मध्ये विशेषतःपान टप-या,मावा,अवैद्य धंद्यांचे ठिकाणे यावर कारवाई करुन अशा प्रकारची सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्यांत येणार आहेत.

शहरातील सर्व प्रकारची छोटी मोठे फ्लेक्स बोर्ड,जाहिरात फलक, शुभेच्छा फलक,होर्डींग्ज,कट आऊट इत्यादीवर कारवाई करण्यात येणार आहे.सदर बोर्ड/फलक लावणारे यांचेवर दंडात्मक कारवाई करुन संबधीत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड,होर्डींग्ज मुळे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश त्या अनुषंगाने शासनाचे आदेश यांचे अवमान होत असुन या बाबत सक्तीने कारवाई करण्यात येणार आहे व तशा सुचना मनपा आयुक्त यांनी सर्व संबधीतांना दिलेले आहेत.तसेच शहरात सध्या नवरात्रोत्सवा निमित्त विविध सामाजीक,सांस्कृतीक मंडळा मार्फत प्रसाद वाटप,भंडारा याचे आयोजन केले जाते. तसेच विविध ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडया,स्टॉल्स लागलेले असतात.अशा सर्व संबधीतांनी अन्न व औषध प्रशासनालय यांच्या नियमित परवानगी शिवाय खाद्य पदार्थाची विक्री तसेच महाप्रसाद भंडा-याचे वाटप करु नये या बाबत स्वच्छतेची योग्य ती काळजी घेण्यांत यावी.

शहरातील मुख्य रस्त्यालगत अनेक दिवसापासुन विविध प्रकारची ना-दुरुस्त वाहने बंद अवस्थेत पडलेली आहेत.त्यामुळे रहदारीस अडथळा येत आहे. तसेच तेथील स्वच्छता करणे करीता सुध्दा अडचण होत असते.या बाबत नागरिक वेळोवेळी तक्रार करीत असतात अशा प्रकारच्या सर्व वाहनावर मनपा मार्फत अतिक्रमण मोहीमेअंतर्गत जप्तीची कारवाई करुन दंडात्मक रक्कम वसुल करण्यांचे आदेश सर्व संबधीत प्रभागांना देण्यांत आलेलेआहेत.

तरी उपरोक्त प्रमाणे सर्व नागरीक अतिक्रमणधारक यांना मनपा मार्फत अवाहन करण्यांत येते की,आपले सर्व प्रकारचे टप-यांचे अतिक्रमणे,शैक्षणीक परिसरातील पान टप-या, अनाधिकृत होर्डींग्ज,फ्लेक्स बोर्ड,जाहिरात फलक,खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल धारक तसेच रस्त्याच्या कडेला असलेली बंद अवस्थेतील, रस्त्याला अडथळा ठरणारी वाहने इत्यादी बाबत मनपा मार्फत सदरची अतिक्रमणे निष्कासित करण्याची मोहीम हाती घेण्यांत आलेली आहे. तरी सर्व अशा प्रकारच्या अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमणे स्वतःहुन काढुन घ्यावीत अन्यथा मनपा मार्फत अतिक्रमणे निष्कासित करुन संबधीतावर गुन्हे दाखल करण्यांची कारवाई करण्यांत येतील.असे अवाहन अहमदनगर महानगरपालिके तर्फे १२ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page