Maharashtra247

प्लॉटींग खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायीकावर खुनी हल्ला करणारे दोघे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (दि.१२ ऑक्टोबर):-प्लॉटींग खरेदी विक्री व्यवसायीक यांचेवर खुनी हल्ला करणारे आरोपीना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बातमीतील हकीगत अशी की,दि. 26/08/2023 रोजी फिर्यादी श्री सुभाष रायभान खरड (रा. देवटाकळी ता.शेवगांव,हल्ली रा.शास्त्रीनगर,शेवगांव,ता. शेवगाव) यांनी ऊसने दिलेले पैसे मागितल्याचे कारणावरुन 1)सुधिर हरिभाऊ बाबर रा. ब्राम्हण गल्ली शेवगांव, 2) सुमित सुधिर बाबर यांनी चाकु,लोखंडी रॉडने खुनी हल्ला करुन गंभीर जखमी केले होते.याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 857/2023 भादविकलम 307,326,323,504,506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासुन फरार झालेले होते.गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री.दिनेश आहेर यांना सुचना दिलेल्या होत्या.त्यानुसार पोनि.श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना देवुन रवाना केले.पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी आरोपीची शेवगाव परिसरामध्ये तसेच आरोपींचे नातेवाईकांकडे माहिती काढुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर अंबड जिल्हा जालना या ठिकाणी पळुन गेलेले असल्याची माहिती प्राप्त झाली.

पोलीस पथकाने अंबड जि.जालना या ठिकाणी जावुन आरोपींची माहिती घेवुन आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक सपोनि/हेमंत थोरात,पोना/रविंद्र कर्डिले,संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे,फुरकान शेख, संतोष खैरे,पोकॉ/किशोर शिरसाठ,जालिंदर माने, चालक पोकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page