Maharashtra247

मॅनेजरला तलवारीचा धाक दाखवून १० लाख रुपये लुटणारे दोघे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

अहमदनगर (दि.२८ फेब्रुवारी):-शेवगांव येथील जिनींग मॅनेजरला तलवारीचा धाक दाखवून 10 लाख रुपये लुटणाऱ्या दोघास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे.

घटनेतील फिर्यादी श्री. विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (धंदा नोकरी,रा.शेवगांव) हे नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बॅकेत देवुन,10 लाख रुपये रोख रक्कम बॅगेत ठेवुन मोटार सायकलवर जाताना पाठीमागुन अनोळखी 2 इसम विना नंबर काळे रंगाचे मोटार सायकलवर येवुन फिर्यादीचे मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले व तलवारीचा धाक दाखवुन नमुद रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेले बाबत शेवगांव पो.स्टे. गु.र.नं. 1206/23 भादविक 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हि घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थागुशाचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.सदर सुचना प्रमाणे स्थागुशा पथक गुन्हा दाखल झाल्यापासुन तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टीने संशयीत आरोपींचा शोध घेत होते.

दरम्यान पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी नामे चेतन तुजारे (रा.वरुर,ता.शेवगांव) याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असुन तो त्याचे राहते घरी आहे,आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने.पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास दिली व शेवगांव पोलीस स्टेशन नेमणुकीचे अंमलदार धाकतोडे,गुंजाळ व पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करण्याच्या सुचना देवुन पथकस रवाना केले. पथकाने लागलीच वरुर, ता. शेवगांव येथे जावुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना पथकास बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम दिसुन आला.पथकाने संशयीतास ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)चेतन प्रमोद तुजारे (रा.वरुर,ता.शेवगांव) असे सांगितले.त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे इतर 2 साथीदार नामे समाधान तुजारे व अर्जुन तुजारे दोन्ही रा. वरुर,ता.शेवगांव अशांनी मिळुन केल्याचे सांगितल्याने आरोपीचे साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे 2) समाधान विठ्ठल तुजारे (रा. वरुर,ता.शेवगांव) हा मिळुन आला व आरोपी नामे 3) अर्जुन ऊर्फ बाळु तुजारे रा. वरुर,ता.शेवगांव (फरार) हा फरार आहे.ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे 1)चेतन प्रमोद तुजारे रा.वरुर,ता. शेवगांव व 2) समाधान विठ्ठल तुजारे रा.वरुर,ता.शेवगांव यांचे कडुन चोरी करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल, चोरी केलेली असा एकुण 10,75,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी,सचिन आडबल,संदीप दरंदले,देवेंद्र शेलार,विजय ठोंबरे,फुरकान शेख,किशोर शिरसाठ,मेघराज कोल्हे,भरत बुधवंत यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page