Maharashtra247

जात पंचायतीच्या लोकांनी जाती बाहेर काढले नगर तालुका सपोनि/प्रल्हाद गीते यांनी मध्यस्थी करत अर्जदार व गैरअर्जदार यांना एकत्र बोलवून न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगत मिटविले प्रकरण

नगर प्रतिनिधी (दि.२७ फेब्रुवारी):-दि.२७ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे प्राप्त तक्रार अर्जातील अर्जदार आप्पा अण्णा आव्हाड यांनी तक्रार अर्ज दिला होता की आम्ही नंदीवाले समाजाचे असून आमच्या समाजातील जात पंचायतच्या लोकांनी आम्हाला जातीतून बाहेर काढले.

हा अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने नगर तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला व संबंधित प्रकरणाची सखोल माहिती घेऊन संबंधित प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याची टिप्पणी करण्यात आली होती.नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस अंमलदार यांनी अर्जातील सर्व गैरअर्जदार व अर्जदार यांना पोलीस स्टेशनला बोलावले होते.

सर्व लोक आल्यानंतर प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते यांनी तक्रार अर्जाचे अवलोकन करून दोन्ही बाजूच्या लोकांशी संवाद साधून समाजातील लोकांशी बोलून सदरचा तक्रार अर्ज हा शेत जमिनीच्या वादातून केला असल्याचे निष्पन्न झालेने दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून सांगून जात पंचायतीबाबत मा. न्यायालयाची माहिती देऊन त्यांचे वाद आपसात चर्चा करून मिटवले.व एकत्रितरित्या एकोप्याने राहण्याचा तक्रारदार व अर्जदार यांना सल्ला दिला. सपोनी/प्रल्हाद गीते यांनी सदरील प्रकरण योग्यरीत्या हाताळून समेट घडवून आणल्याबद्दल नगर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page