साळवे कुटुंबीयांवरील भ्याड हल्ला अजिबात सहन करणार नाही ना.रामदास आठवले..ससून रुग्णालयात ना.आठवले यांनी साळवे कुटुंबीयांची घेतली भेट
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.रविवारी नान्नज ता.जामखेड येथे तलवार,कोयते व काठ्यांनी साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला हा संतापजनक प्रकार आहे.मी स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मकोका कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा ना.आठवले यांनी दिला.
तसेच साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे.आरोपींचे मोबाईल सीडीआर तपासून सूत्रधारांना अटक करावी.अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.ना.रामदास आठवले यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात जाऊन सुनील साळवे यांच्या जखमी कुटुंबीयांची भेट घेतली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात जाऊन सुनील साळवे यांच्या जखमी कुटुंबीयांची भेट घेतली. डॉक्टरांनी अभिजीत साळवे, यशदीप साळवे व रत्नमाला साळवे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.इतर जखमी आदर्श साळवे,रेश्मा साळवे,दिग्विजय सोनवणे व सद्दाम पठाण यांचीही आठवले यांनी विचारपूस केली.रविवारी रात्री नान्नज,ता. जामखेड येथे दहा-बारा जणांनी तलवार,कोयते व काठ्यांनी साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला.
महिलांनाही गंभीर जखमी करण्यात आले.अभिजीत साळवे यांच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.सदर घटनेतील हल्लेखोर गुंडांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी.सर्व आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा.अशी मागणी साळवे कुटुंबीयांनी ना.रामदास आठवले यांच्याकडे केल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली.या प्रसंगी काकासाहेब खंबाळकर,श्रीकांत भालेराव,विजय वाकचौरे,परशुराम वाडेकर,आशिष गांगुर्डे,संजय सोनवणे,महेंद्र कांबळे,शैलेंद्र चव्हाण,महिपाल वाघमारे,शशिकला वाघमारे, गणेश साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
