जिल्ह्यात पुन्हा इम्पिरीयल ब्लयु,रॉयल स्टॅग व्हिस्की,ओ.सी.ब्ल्यु व्हिस्की व मॅकडॉल नं.1 बनावट विदेशी मद्य विक्री जोरात सुरु..राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव-श्रीरामपुर रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट विदेशी मद्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.हि कारवाई श्री.राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई,श्री.प्रसाद सुर्वे सहआयुक्त अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य राज्य उत्पादन शुल्क मुंबई,श्री.सागर धोमकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग,श्री. प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर,श्री. प्रविणकुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दि.19 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4.00 वा.च्या सुमारास केली आहे.
बनावट विदेशी मद्य वाहतुक करताना आरोपी नामे पोपट भास्कर पवार (आशीर्वादनगर, काळे वस्तीजवळ,वार्ड नं.1, श्रीरामपुर,ता.श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर) याच्या ताब्यातून एक होंडा कंपनीची शाईन क्र.MH-17-CZ-9766 व बनावट विदेशीमद्य तसेचत्याच्या राहात्या घरी जावुन झडती घेतली असता बनावट विदेशी दारू 180 मिली मापाच्या इम्पिरीयल ब्लयु,रॉयल स्टॅग व्हिस्की,ओ.सी.ब्ल्यु व्हिस्की व मॅकडॉल नं.1 व्हिस्की विविध बॅच क्र.असलेल्या अशा एकुण 169 बाटल्या,बनावट बुचे, मोकळ्या बाटल्या,व इतर एकुण 1,40,585/- साहित्य जप्त करण्यात आले आहे.बनावट दारुची ॲन्टोनपार मशीनच्या सहाय्याने तपासणी केली असता सदर विदेशी दारु बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येते.सदर आरोपीने वापरलेल्या बाटल्यांचा पुर्नर वापर करुन त्यामध्ये बनावट व आरोग्यास अपायकारक मद्य भरुन त्यावर पुन्हा बनावट बुचे लावुन त्याची विक्री अवैध दारु विक्री करणा-या इसमामार्फत करत होता.या आरोपी विरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ब) (ड) (ई) (फ) व 81, 83, 90, 108 अन्वये रितसर गुन्हा नोंद केला आहे.
सदर आरोपीस न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगांव विभाग जि.अहिल्यानगर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 श्रीरामपुर जि.अहिल्यानगर यांनी केली आहे.निरीक्षक एस.एस.हांडे,ए. डी.देशमाने,दुय्यम निरीक्षक आर.बी.गायकवाड,के.एम.सुळे, सायली गावडे,सहाय्यक दु.नि. एस.एस.गारळे,जवान प्रमिला कासार,यु.जी.काळे, एस.ए.बटुळे,ओ.बी.पालवे, जवान नि.वाहन चालक एस.एम.कासुळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.श्री. आर.बी.गायकवाड,दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोपरगांव-3 जि.अहिल्यानगर हे सदर गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.
तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, मद्य खरेदी करताना परवानाधारक दुकानातुन करावी तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्री संदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. १८०० २३३ ९९९९ व व whats App क्र. ८४२२ ०० ११ ३३ तसेच ०२४२२ २२९५५५ या क्रमांकावर संपर्क करावा.श्री.एस.एस.हांडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगांव विभाग जि.अहिल्यानगर यांनी सदर कारवाईची माहिती दिली.
