Crime..हॉटेल रिलॅक्स इन येथे पोलिसांचा अचूक सापळा.. पिस्तुल २ जिवंत काडतुसे व मॅग्झीनसह तरुण जेरबंद!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव पोलीस स्टेशन यांनी मध्यरात्री केलेल्या अचूक आणि नियोजनबद्ध कारवाईत देशी बनावटीचे पिस्तुल (Gun) बाळगणाऱ्या एका आरोपीस रंगेहात पकडत तब्बल २०,२५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.दि.१२/०२/२०२६ रोजी रात्री सुमारे ११.०० वाजता पो.कॉ.शाम गुंजाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,आखेगाव रोडने एक काळ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ शेवगावकडे येत असून त्यामधील इसमाकडे देशी बनावटीचे पिस्तुल आहे.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने पोसई आजीनाथ कोठाळे,पोकॉ.अर्जुन मुंढे,पोकॉ. राहुल खेडकर,चापोकॉ.किशोर पालवे व होमगार्ड प्रकाश गरड यांना सूचना देत पथक तयार केले.आखेगाव रोडवरील हॉटेल रिलॅक्स इन येथे पोलिसांनी सापळा रचला.काही वेळातच काळ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ येताना दिसताच ती गाडी थांबवून तपासणी करण्यात आली.वाहनातील इसमाचे नाव विचारले असता त्याने जावेद मुनिर सय्यद (वय २७,रा. आखेगाव रोड,भापकर वस्ती, शेवगाव,ता.शेवगाव,जि. अहिल्यानगर) असे सांगितले. अंगझडती दरम्यान त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तुल,एक मॅग्झीन व दोन जिवंत काडतुसे (राऊंड) आढळून आले.सदर शस्त्राबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.या प्रकरणी पोकॉ/८२९ राहुल नामदेव खेडकर यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ८५/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई रामहरी खेडकर हे करीत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु (उपविभाग शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पो.नि.संतोष मुटकुळे,पोसई.आजीनाथ कोठाळे,पोसई.रामहरी खेडकर, पोहेकॉ.चंद्रकांत कुसारे,पोकॉ. शाम गुंजाळ,पोकॉ.भगवान सानप,पोकॉ.राहुल खेडकर, पोकॉ.ईश्वर बेरड,पोकॉ.राजू बडे, पोकॉ नकुल फकले,चापोकॉ. किशोर पालवे,होमगार्ड प्रकाश गरड तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडू यांनी केली आहे.शेवगाव पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की,बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ आहे.या कारवाईमुळे गुन्हेगार प्रवृत्तीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
