स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा,पान मसाल्यावर मोठी कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी गुटखा पानमसाला,मावा,अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत.दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांना बेलवंडी पो.स्टेशन हद्दीत अवैद्य धंद्याची माहिती काढुन कारवाई करणे कामी पाठविले असतांना पोहेकॉ/राहुल व्दारके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे अनिकेत रामदास सोनवणे (रा. ढवळगांव,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर) हा मल्हार पान स्टॉल,ढवळगांव फाटा,ता. श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर) येथे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंध असलेला व शरिरास अपयकारक असा गुटखा पान मसाला विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगीत आहे आता गेल्यास मिळुन येईल,अशी खात्रीलायक माहिती मिळाली.
नमुद बातमीचे अनुषंगाने,पोनि.किरणकुमार कबाडी यांना माहिती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली नमुद पथक ढवळगांव फाटा,ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर येथे जावुन, मल्हार पान स्टॉल येथे असलेला एक इसम यांस नाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नांव अनिकेत रामदास सोनवणे, वय 27 वर्षे असे सांगितले,त्यांच्या पान स्टॉलची झडती घेतली असता पानटपरी मध्ये पान मसाला गुटखा व तंबाखु पुडे असा एकुण रु.2 लाख 42,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/ 2293 राहुल कचरु डोके नेम. स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 297/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/राहुल व्दारके, मपोहेकॉ/भाग्यश्री भिटे,पोना/ रिचर्ड गायकवाड,पोना/ भिमराज खर्से,पोना/बाळासाहेब नागरगोजे, पोना/सोमनाथ झांबरे,चासफौ/रामभाऊ भांड यांनी केलेली आहे.
