Maharashtra247

मध्यरात्रीच्या सुमारास तरुणावर खुनी हल्ला नागरिक भयभीत पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज

संगमनेर प्रतिनिधी (नितीन भालेराव):-संगमनेर शहरात तिरंगा चौकात राहणाऱ्या हुसेन बाबुमिया शेख या युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

हुसेन हा आपला मित्र धीरज पावडे यांच्या घरी भेटण्याकरता लक्ष्मीनगर परीसरात गेला असता एका १० ते १२ जणांच्या टोळक्याने रात्रीच्या सुमारास भरवस्तीत कोयत्याने सपासप वार करत एवढ्यावरच न थांबता डोक्यावर दगड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.भरवस्तीत झालेल्या या प्रकाराने नागरिक अत्यंत भयभीत झाले आहे.झालेल्या प्रकाराने यावरून लक्षात येते की संगमनेर शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिलेला नाही.त्यामुळे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून कारवाया थंड झाल्या आहेत. त्यांनी आता खपकी भूमिका घेतली पाहिजे की ज्याने हद्दीतील अवैध धंदे जे बोकाळलेले आहेत तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धाक निर्माण होईल असे प्रयत्न केले पाहिजे त्यामुळे अशा गोष्टी वारंवार घडणार नाहीत.या गोष्टीला आळा बसेल अशा कारवाया केल्या पाहिजे अशी नागरिकांमध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांकडून अपेक्षा आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली.हुसेन बाबुमियां शेख यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भादंविक 307,323,324 143,147148,149,प्रमाणे गोट्या घेगडमल,निलेश काथे,अविनाश काथे,ओम काथे,साहील देव्हारे,ऋषी धिमते,अरबाज पठाण, प्रथमेश अशोक पावडे,सनी शेखर तरटे,अविनाश सोमनाथ मंडलिक,सौरभ राजेंद्र फटांगरे सर्व (रा. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव विठ्ठल पवार करीत आहे.

You cannot copy content of this page