अहमदनगर (दि.१२ मार्च):-सावेडी उपनगर मधील भिस्तबाग महाल परिसरात बांधकाम साईटवरुन इलेक्ट्रीक वस्तु चोरी करणारे दोन आरोपी व एक विधीसंघर्षीत बालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि.६ मार्च रोजी घटनेतील फिर्यादी श्री.संतोष काशिनाथ पादीर (रा.टाकळी खातगांव, ता.जि.अहमदनगर) यांनी भिस्तबाग परिसरामध्ये बांधकाम कंट्रक्शनचे रुममध्ये ठेवलेले लाईट फिटींगचे वायर बंडल,बोर्ड स्विच,बोर्ड प्लेट, कटर 94,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रुमचा दरवाजा कशाने तरी तोडुन घरफोडी करुन चोरुन नेला होता.
या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 311/2024 भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.दिलेल्या आदेशानुसार पोनि/आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन आरोपींची माहिती काढुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पथकास सुचना देवुन रवाना केले होते.
शहरामध्ये मालाविरुध्दचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिस्तबाग महाल परिसरामध्ये संशयीत इसम नामे 1)सौरभ ज्ञानेश्वर शेळके रा.तपोवन रोड,समता कॉलनी, अहमदनगर, 2)आदित्य संजय नरोटे रा.तपोवन रोड, राही प्लाझा मागे, अहमदनगर, 3)विधीसंघर्षीत बालक,असे मिळुन आले.यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी व विधीसंघर्षीत बालकांचे ताब्यातुन 70,000 /- रुपये किमतीचे वायरचे बंडल, 23,925/- रुपये किमतीचे स्विच बोर्डच्या प्लेटा., 7000/- रुपये किमतीचे लाईटचे स्विच,3750/- रुपये किमतीचे कटर मशीन असा एकुण 1,04,675 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 311/2024 भादवि कलम 454,457,380 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे,पोलीस अंमलदार संदीप पवार,रविंद्र कर्डीले,भिमराज खर्से,संतोष खैरे,रणजित जाधव,प्रमोद जाधव,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड यांनी केली आहे.