एक दिवशीय बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळा संपन्न…
पारनेर (प्रतिनिधी):-दि.२१ मे २०२४ रोजी पारनेर तालुक्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता पारनेर तालुका स्तरावर पारनेर पंचायत समिती, एकात्मिक बालविकास विभाग आणि स्नेहालय उडान प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने बालविवाह प्रतिबंधक एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पारनेर पंचायत समितीचे सभपती, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि अंगणवाडी ताई यांना स्नेहालय संस्था आणि उडान बालविवाह प्रतिबंध प्रकल्प विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम, ग्रामीण स्तरावर उपाय योजना, बालविवाह होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली. बालविवाहाची माहिती मिळाल्यास ग्रामसेवक व अंगणवाडी ताई यांनी होत असलेला बालविवाह रोखण्यासाठी कोणकोणत्या यंत्रणांसोबत काम करायचे आहे, याची सविस्तर सादरीकरण करून माहिती देण्यात आली. तसेच झालेल्या किंवा होत असलेल्या बालविवाह रोखल्यानंतर सदरील बालिका व मुलाच्या दोन्ही पालकास संपूर्ण कागदपत्रासोबत बाल कल्याण समिती अहमदनगर समोर हजर करणे बंधनकारक आहे असे या सांगण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना स्थानिक ठिकाणी काम करताना कोणकोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागतात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. स्नेहलच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यात काम करताना पुढील काही प्रश्न सुद्धा उद्भवले यावर सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली. १. बालविवाह लवकर करण्यामागील कारणे काय? पालकांच्या मनात नेमकी कसली भिती? २.काय आहेत बालविवाहाचे दुष्परिणाम? ३. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास काय करावे? ४. बालविवाह रोखण्यासाठी काय केलं पाहिजे? ५.प्रत्येक जिल्ह्यातील, गावातील, शहरी भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका काय?६. बालविवाह रोखण्यात अंगनवाडी सेविकेची भूमिका कशी महत्त्वाची असते? ७.बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांनी भूमिका काय? ८. बाल कल्याण समिती नेमकं काय काम करते? १०. तुमच्या डोळ्यासमोर बालविवाह होतोय… पण कळत नाही काय भूमिका घ्यावी… कशी तक्रार करावी… कोणती यंत्रणा यावर काम करते… आणि कसं काम करते? ११.पोलिसांना बालविवाह होत असल्याची माहिती द्यावी.
पोलीस पाटलांच्या घरात जर बालविवाह होत असेल तर तुमची भूमिका काय असावी?१२.लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना म्हणजेच, मंगल कार्यालय, जेवण, डेकॉरेक्शन, वाजंत्री, फोटोग्राफर इ. सगळा खर्च झालेला असताना लग्न थांबवायचं कसं?बालविवाह कायद्यासंदर्भात समाजात जनजागृती कशी केली पाहिजे? १३. बालविवाह होत असल्याचे पुरावे कसे शोधावे? जिल्हापातळीवर कोण-कोणती यंत्रणा आहे ? १४.बालविवाह झाला असेल तर कश्या पद्धतीने कार्यवाही करावी? वरील युद्ध प्रश्नांवर चर्चा करून सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर त्यावेळी दिले. यावेळी च्या ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी आपल्या गाव स्तरावर बालविवाह रोखले आहे. यांचे उडान टीम तर्फे सत्कार करण्यात आले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पवार सर यांनी स्नेहालय उडान टीमचे आभार व्यक्त केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता उडान टीमचे सामाजिक कार्यकर्ते शाहिद शेख पूजा झिने, शशिकांत शिंदे, सीमा जुनी आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि इतर पदाधिकारी,शिपाई यांनी परिश्रम घेतले.