मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १२ विचा निकाल १०० टक्के;विद्यालयात वाहते शिक्षणाची गंगा मा. महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात
संगमनेर प्रतिनिधी:-संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या १२ वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
ही मुले एका छोट्याशा खेडेगावात राहून शेतातील कामे करून अभ्यास करून त्यांनी विज्ञान शाखेत उज्वल यश मिळवल्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.प्रथम पाच विद्यार्थ्यांपैकी सरोदे तेजस ज्ञानदेव (७३.५० %), कारंडे प्रज्वल बाळशीराम (७३.३३ %),कु. गायकवाड सायली श्याम (७२.८३ %),वाघमोडे शिवाजी सावळेराम (७०.५०%), खेमनर समाधान रमेश (७०.३३ %),इ. विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की या विद्यालयात शिक्षणाची गंगा वाहत आहे येथील शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या योग्य प्रकारे शिक्षणाचे धडे देतात यामुळे या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला.
यावेळी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार डॉ.सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे,राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख,सह्याद्री संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्षा व एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ.जयश्रीताई थोरात,सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात,सह सेक्रेटरी चासकर सर,संस्थेचे रजिस्टार गवांदे सर,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री.सहादू दामू खेमनर,शालेय व्यवस्थापन सदस्य श्री.रावसाहेब रावजी खेमनर,श्री.सोपान राधु खेमनर,अंभोरे सोसायटी चेअरमन श्री.रावजी भागा खेमनर,व्हाईस चेअरमन श्री.वाल्मिक सोपान खेमनर,संचालक श्री.भागवत मंजाबापु खेमनर,श्री.रमेश केरु खेमनर,सरपंच सौ.सुरेखा भाऊसाहेब खेमनर उपसरपंच श्री.किसनराव खेमनर प्राचार्य श्री. गायकवाड सर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.