कोतवाली पोलिसांकडून नागरिकांना महत्वाच्या सूचना काय आहेत सूचना वाचा सविस्तर
अहमदनगर (दि.२१ मे):-सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने शहरी व ग्रामीण भागात नागरिक घरास कुलूप लावून गच्चीवर किंवा टेरेसवर जाऊन झोपतात.रात्रीचे सुमारास चोरटे लक्ष ठेवून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करतात असे प्रकार घडलेले आहेत.
तरी सर्व नागरिकांना कळविण्यात येते की त्यांनी गच्चीवर झोपते वेळी घरातील मौल्यवान वस्तू (सोने,चांदी,जवाहर, हिरे व रोख रक्कम) ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी.किंवा बँक लॉकर मध्ये ठेवावे.
👉 बाहेरगावी जातेवेळी (पर्यटन, यात्रा, सुट्टी)वरील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात अथवा जवळचे विश्वासाचे नातेवाईक यांच्याकडे ठेवाव्यात, जेणेकरून चोरीस जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
👉उपनगर तसेच कमी लोकवस्ती मध्ये लोक घरामध्ये एकटेच राहणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.
👉 सध्या घरफोडी व वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्याने घरासमोर लावलेली वाहने चोरी होणार नाहीत व काही संशया स्पद जाणवल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे याबाबतही दक्षता घ्यावी…
👉 ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा, व काही जाणवल्यास पोलीस स्टेशनं ला संपर्क करावा
👉 बाहेरगावी जाताना आपल्या शेजाऱ्यांना कळवावे व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. बाहेरगावी जाताना शक्यतो घरातील एक सदस्य घरात असावा.
👉 रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड येथून प्रवास करताना शक्यतो कमी मौल्यवान वस्तू जवळ बाळगाव्यात. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चोरी करतात, प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची चोरी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
👉 रात्रीच्या /दिवसाच्या वेळी दुचाकी, चारचाकी वाहने व्यवस्थित हॅन्डल लॉक करून घराजवळच लावावे.
👉 रात्रीच्या वेळी उपनगरामध्ये शक्य असल्यास पोलीस मित्र म्हणून पेट्रोलिंग करावी. त्याबाबत व्हाट्सअँप ग्रुप तयार करावा.
👉 संशयास्पद इसम आढळून आल्यास त्याला मारहाण न करता हालचालीवर बारीक लक्ष ठेवून पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
👉 आपल्या उपनगरा मध्ये सायरनचा जास्तीत जास्त वापर करावा.