शहरात दोन गटात वाद कोयत्याचा सर्रास वापर; ७ आरोपी व १ विधीसंघर्षीत बालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
अहमदनगर (दि.२० मे):-अहमदनगर शहरात दोन गटातील वादावरुन एकमेकांवर कोयत्याने हल्ला करणारे ७ आरोपी व १ विधीसंघर्षीत बालक यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.बातमीची हकीगत अशी की,घटनेतील फिर्यादी नामे चेतन संतोष सरोदे (रा.भिमचौक,गांधीनगर, बोल्हेगांव,ता.जि. अहमदनगर) हा लोकसभा निवडणुकीचे वेळी मतदान केंद्राजवळील भारतीय जनता पार्टीचे बुथजवळ थांबलेला असल्याचे कारणावरुन दि.१८ मे रोजी आरोपी नामे आदेश किसन भिंगारदिवे,संकेत किसन भिंगारदिवे,जमीर पठाण, सोन्या लांडगे,रोहित जाधव,पंकज दराडे व त्यांच्या सोबत असलेले इतर अनोळखी ४ ते ५ साथीदारांनी लाकडी दांडके,कोयत्याने फिर्यादी व त्याचे सोबत असलेल्या मित्रांना मारहाण केली आहे.
या घटनेबाबत तोफखाना पो.ठाणे येथे गु.र.नं. 619/2024 भादवि कलम 307,143,147, 148 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तसेच फिर्यादी आदेश किसन भिंगारदिवे यास पंकज मच्छिंद्र दराडे याला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने तो त्याचे मित्रासह गावडे किराणा दुकानासमोर जावुन आरोपी आशिष विठ्ठल शिरसाठ,चेतन संतोष सरोदे,योगेश संतोष सरोदे,शारुन दाऊद जाधव,यश रावसाहेब शिरसाठ यांना तुम्ही मारहाण का केली याबाबत विचारणा केला असता त्यांनी फिर्यादी व त्याचे मित्रांना लाकडी दांडके,कोयत्याने मारहाण केली आहे.या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 618/2024 भादवि कलम 324,323, 504,143,147,148 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
हि घटना गंभीर स्वरुपाची असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन स्वतंत्र पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत सुचना देवुन पथक रवाना केले होते.दोन्ही पथकांनी जिल्हा रुग्णालय अहमदनगर,मॅककेअर हॉस्पीटल अहमदनगर येथे ऍ़डमिट असलेल्या फिर्यादींना भेटुन, गुन्ह्याची संपुर्ण माहिती घेटली त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत अनोळखी आरोपींचे पुर्ण नांव पत्ते निष्पन्न केले. सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर लागलीच फोन बंद करुन पळुन गेलेले होते.सदर आरोपींचे वास्तव्याची माहिती काढुन तोफखाना पो.ठाणे गु.र.नं. 619/2024 भादवि कलम 307 वगैरे या गुन्ह्यातील आरोपी नामे अभिषेक उर्फ सोन्या राजेंद्र लांडगे,संकेत किसनराव भिंगारदिवे,जमीर शौकत पठाण,ओमकार सतिष आपरे,परमेश्वर हरिभाऊ मगर यांना तसेच तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं.618/2024 भादवि कलम 324 वगैरे या गुन्ह्यातील आरोपी नामे थॉमस उर्फ योगेश संतोष सरोदे,यश रावसाहेब शिरसाठ,एक विधीसंघर्षीत बालक यांना अहमदनगर शहरामधुन विविध ठिकाणावरुन ताब्यात घेवुन पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, रविंद्र कर्डीले,दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विशाल दळवी,सचिन अडबल,संतोष खैरे, सागर ससाणे,रोहित येमुल,प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे,उमाकांत गावडे,अरुण मोरे यांनी केलेली आहे.