चिंचोली गुरव कारमाळा रोडवर दोन ठिकाणी घरफोडी;पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी समस्त गावकऱ्यांची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावात करमाळा रोड लगत दोन घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.
हि घटना २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.या प्रकारामुळे चिंचोली गुरव गावामध्ये एक दहशतीचे वातावरण तयार झाले आहे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहे.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत.तरी संगमनेर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास गावात गस्त घालावे ज्याने चोरीवर आळा बसेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.चिंचोली गुरव गावामध्ये मागच्या दोन महिन्यापासून विहिरीतील मोटर चोरांनी अक्षरशःधुमाकूळ घातला होता.त्यावेळेस पोलिसांनी गावात सलग पंधरा दिवस गस्त घालून मोटार चोरांचा बंदोबस्त केला होता.
वारंवार होणाऱ्या भुरट्या व मोठ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झाल आहे.अशा चोऱ्यांमुळे भीती निर्माण होऊन नागरिकांना घरामधून बाहेर पडणे ही आता मुश्किल झाले आहे.तरी लवकरात लवकर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव देऊन तपास सुरू केल्या असल्याची माहिती दिली.