शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा
अहमदनगर (दि.२५ प्रतिनिधी):-अहमदनगर महानगरपालिकेच्या मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाची क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा तयार करणे व जागेचे सुशोभिकरण करण्यास आज दि.२५ सप्टेंबर रोजी कार्यारंभ आदेश काढला आहे.
लवकरच या पुतळ्यांच्या कामाचे भूमिपूजन होऊन कामास सुरवात होणार आहे.मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या बरोबरच प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे कार्यारंभ आदेश आज निघाले आहे.
या सर्व महापुरुषांच्या आकर्षक तयार होणाऱ्या पुतळ्यांमुळे शहराची शोभा वाढणार आहे त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.