भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे उद्घाटन
अहमदनगर प्रतिनिधी:-अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री.हिरामण झिरवळ तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री.आकाश दरेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.विलास साठे,महानगरपालिका शिक्षणाधिकारी श्री.अरुण पालवे तसेच निबंध स्पर्धा अशासकीय जिल्हा समिती सदस्य श्री.यश शहा,श्री.योगेश मुथा,श्री.विनोद संकलेचा,श्री.सुदर्शन डुंगरवाल व स्पर्धेत सहभागी असलेले विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.उल्हास दुगड यांनी केले तर उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी श्री.हिरामण झिरवळ यांनी आपल्या मनोगतातून सुविचारांचा अर्थ समजून घेऊन ते आचरणात आणले पाहिजेत,वाचनाने चांगला माणूस घडतो असे सांगितले.श्री. आकाश दरेकर यांनी विद्यार्थ्यांनी सर्व शालेय उपक्रमात सहभागी का व्हावे याचे महत्त्व पटवून दिले.श्री.विलास साठे यांनी आजच्या काळात विचारांची लढाई जिंकणाऱ्या भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे तसेच चांगले विचार पेरावे लागतात असे मत व्यक्त केले.श्री.अरुण पालवे यांनी विविध स्पर्धांमधील सहभाग भविष्याची दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त ठरतो असे सांगितले.श्री.इंजी.यश शहा यांनी स्पर्धेचे स्वरूप समजावून सांगून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व या प्रशालेचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला.कार्यक्रम आयोजनासाठी शहा यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन शालेय शिक्षण विभाग महापालिका प्रशासन यांच्याशी समन्वय साधला.
संपूर्ण महाराष्ट्रात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली व ललित गांधी,संदीप भंडारी व इतर यांच्या समन्वयातून 30 सप्टेंबर पर्यंत स्पर्धा राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.जिल्हाधिकारी,निवासी जिल्हाधिकारी,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी , महापालिका प्रशासन यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती.आशा सातपुते, पर्यवेक्षक श्री.विष्णू गिरी,श्री.रवींद्र भांड यांचे मार्गदर्शन लाभले.अध्यापिका सौ.प्रगती बेगडे व श्री.अमेय कानडे यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती शोभा पालवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक श्री.सतीश गुगळे यांनी केले.