तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तरुणाला कठोर शिक्षा व्हावी मनसे शहराध्यक्षा अक्षरा घोडके;मनसेचा दणका अखेर त्या तरुणावर गुन्हा दाखल
नाशिक प्रतिनिधी:-नाशिक शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.
हिरावाडी येथे राहणारा अनिकेत विजय जाधव या तरुणाने एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून साखरपुडा करून तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेवून अखेर लग्नास नकार देत फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर उपनगर पोलीस स्टेशनमध्ये भादविक 69,318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरुवातीला पीडितेची फिर्याद घेण्यास पोलीस टाळाटाळ करत होते,परंतु मनसे शहराध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या अक्षरा घोडके यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पिडीतेला त्याला न्याय भेटला व आरोपी नराधम अनिकेत जाधव याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.यावेळी मनसे नेत्या अक्षरा घोडके म्हणाल्या की आरोपी हा सराईत असून तो मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना खोटे आश्वासन देऊन हे कृत्य कायम करत आहे.आरोपीची ही दुसरी ते तिसरी वेळ आहे त्यामुळे या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.त्यामुळे समाजात पुन्हा अशा घटना होणार नाही.