आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन निर्धारासाठी एक पाऊल स्नेहालय संचलित उडान तर्फे निर्धार
अहमदनगर (दि.१ ऑक्टो):-२ ऑक्टोबर,आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या निमित्ताने आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चालूया… अहिंसेच्या या महत्त्वपूर्ण दिवशी आपण संकल्प करू की,अल्पवयीन मुलींचे बालविवाह थांबवू आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेला संमती देणार नाही.
स्नेहालय संचलित उडान तर्फे आपण निर्धार करतो की,कोणतीही मुलगी अन्यायाला सामोरी जाणार नाही.प्रत्येक मुलीला सुरक्षितता, शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळवून देऊ.
“हिंसा ही कमकुवतपणाचे लक्षण आहे,अहिंसा ही खरी शक्ती आहे.” महात्मा गांधी
गांधीजींच्या आदर्शांनुसार एक होऊया आणि एका मुलीला तिच्या अधिकारांसाठी उभं करूया.
आजचा निर्धार, उद्याचे उज्ज्वल भविष्य!
हिंसेच्या विरोधात उभे रहा, अहिंसेच्या मार्गाने चला.!
टीम उडान 🌿
बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या….9011026495