Maharashtra247

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गावठी कट्ट्यासह ३ जिवंत काडतुस जप्त

 

अहमदनगर (दि.२ ऑक्टो):-जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमा कडून 1 लाख 68,000/हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह 1 गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुस जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष लोढे,प्रशांत राठोड,संतोष खैरे,किशोर शिरसाठ,बाळासाहेब खेडकर,प्रमोद जाधव,आकाश काळे व महादेव भांड अशांचे पथक तयार करून,जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना देवुन पथक रवाना केले.तपास पथक कोपरगाव शहरामध्ये अवैध हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती घेत असताना पोनि/आहेर गुप्तबातमीदाराकडून इसम नामे शरद गोटीराम फुलारे, (रा.पोहेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर) हा हॉटेल जे डी बिर्याणी हाऊस,येवला नाका, कोपरगाव याठिकाणी त्याचे कब्जात विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन आलेला असल्याची बातमी मिळाली.

पोनि/दिनेश आहेर यांनी बातमीची हकीगत तपास पथकास कळवून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.त्यानुसार पथकाने हॉटेल जे डी बिर्याणी हाऊस,येवला नाका,कोपरगाव याठिकाणी जाऊन सापळा लावुन आरोपी नामे शरद गोटीराम फुलारे,यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता आरोपीचे ताब्यातुन 30,000/-किंमतीचा 1 गावठी पिस्टल, 3,000/- किंमतीचे 3 जिवंत काडतुसे, 1,20,000/- रू.किंमतीची बजाज पल्सर मोटार सायकल व 15,000/- रू किंमतीचा मोबाईल असा एकुण 1,68,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे बारकाईने चौकशी केली असता आरोपीने कोपरगाव,संगमनेर व नाशिक शहरात गुन्हे केल्याची माहिती दिली.आरोपी शरद गोटीराम फुलारे,याचे विरूध्द कोपरगाव शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 447/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page