गावठी कट्टा विक्री करणारा जेरबंद कट्टा हस्तगत एमआयडीसी पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर (दि.५ प्रतिनिधी):-एमआयडीसी परिसरात विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत आरोपीस पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी.माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की एमआयडीसी हद्दीतील वडगाव गुप्ता शिवारातील नगर मनमाड रोड लगत घोडे पाटील यांच्या बंद पडलेल्या गोडाऊन जवळ एक इसम हा त्याच्या जवळ अवैधरित्या गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे.अशी माहिती समजल्याने सपोनी.चौधरी यांनी पोलीस अंमलदार यांना सदरील ठिकाणी जाऊन खात्री करून संशयित इसमास ताब्यात घ्या असा आदेश दिल्याने पोलीस अंमलदार सदरील ठिकाणी गेले असताना आरोपी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला परंतु पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास सीताफिने ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला.
त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष विलास कासार सांगितले.या इसमाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहेकॉ.राजू आप्पासाहेब सुद्रिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ७९६/२०२४ आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याची सपोनी माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई.मनोज मोंढे,पोहेकॉ.राजू सुद्रिक,नितीन उगलमुगले,जयसिंग शिंदे,किशोर जाधव यांनी केली आहे.