दिवाळी सणानिमित्त नगर कल्याण रोडवरील होलसेल फटाका मार्केट मधील लकी ड्रॉ सोडत संपन्न
नगर प्रतिनिधी:-कल्याण रोडवर अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे वतीने जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका विक्री मार्केट मधील लकी ड्रॉ सोडत फटाका असोसिएशनच्या सर्व पदाधीकाऱ्या मार्फत करण्यात आली या वेळी फटाका असोसिएशन चे अध्यक्ष गजेंद्र राशीनकर,सचिव श्रीनिवास बोज्जा,उपाध्यक्ष सुरेश जाधव व गणेश परभणे सहसचिव अरविंद साठे कोषध्यक्ष शिवराम भगत आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.
लकी ड्रॉ मधील असोसिएशन च्या वतीने ठेवण्यात आलेले पहिले बक्षीस इलेक्ट्रिक बाईक वांबोरी येथील अशोक पुंड यांना लागली तर दुसरे बक्षीस 5 ग्रॅम गोल्ड क्वाईन निफाड येथील चेतन बोरा यांना लागले तर तिसरे बक्षीस नंदनवन फटाका मार्ट च्या वतीने 50 ग्रॅम चांदीचे क्वाईन अहिल्यानगर येथील सर्वेश सब्बन यांना लागले तर चौथे बक्षीस अमोल तोडकर फटाका व क्षीरसागर फटाका यांचे मार्फत फ्रिज घोसपुरी येथील सरफ्रराज शेख यांना लागले, पाचवे बक्षीस टकले फटाका मार्फत वॉटर क्युरिफायर शनिशिंगणापूर येथील ऋषिकेश गुणवंत यांना लागले, सहावे बक्षीस मल्हार फटाका यांचे वतीने ओव्हन भिंगार येथील दिपा सातपुते यांना मिळाले, सातवे बक्षीस चंगडे यांचे मार्फत ऐल ई डी टी व्ही माळीवाडा येथील लक्ष्मी माता मंदिर यांना लागले, आठवे बक्षीस निखिल परभणे यांच्या मार्फत पाच इंडेक्शन ज्ञानेश हरिचंद्रे, राहुरी, लक्ष्मीकांत नलला, श्रमिक नगर, सुनीता ठोंबरे, निर्मल नगर, प्रवीण घोरपडे, बैजू भाभूळगाव, ताहेर खान, माळीवाडा यांना मिळाले, नववे बक्षीस महाराज फटाका मार्फत 5 मिक्सर निलेश शिंदे, गुंजाळवाडी, वेदांत शिनगारे, निर्मल नगर, पूजा सत्रे, गोवर्धन, पारनेर, आदित्य जाधव कळंब यांना मिळाले. दहावे बक्षीस अवतार फटाका मार्फत स्मार्ट फोन यशराज पागुळे, रतडगाव यांना प्राप्त झाले, अकरावे बक्षीस अरविंद फटाका मार्फत ट्रॅव्हलिंग बॅग मुबारक हसन सय्यद, निर्मल नगर यांना प्राप्त झाले. बारावे बक्षीस पटवेकर फटाका मार्फत 5 पैठणी किरण उमाप, पुणे, पगडचंद्र भगवान, समता नगर कल्याण रोड, धनाजी कुंभार, वाकड पुणे, पंकज पालवे, मेहेकरी, विभा सत्रे, अहिल्यानगर यांना मिळाले तेरावे बक्षीस श्री विशाल फटाका मार्फत 5 सिलिंग फॅन शैलेंद्र भागवत, शेरकर गल्ली, योगेश साव, पोलीस कॉलोनी, रुपेश सांगळे, पारनेर, गिते राहुल, विळदघाट, मनीषा म्हस्के, विळदघाट यांना मिळाले चौदावे बक्षीस लक्ष्मी फटाका बोज्जा ब्रदर्स यांच्या मार्फत पाच इस्तरी नीलम जाधव, कळंब, संदीप बोरुडे, विनायक नगर, संदीप यादव, बोरुडे मळा, आदेश वाळके, दरेवाडी, अंजली नाबगे, गांधी नगर बोल्हेगाव यांना मिळाले.या लकी ड्रॉ साठी मेट्रिक्स जिम चे संचालक स्वप्नील पर्वते यांनी विशेष सहकार्य केले.
या वेळी फटाका मार्केट साठी लाईट पुरवठा करणारे प्रताप भोजणे, पटवेकर डेकोरेटर्स चे विकास पटवेकर, सिक्युरिटी चे उंडे सर यांचा सन्मान केला, तामिळनाडू येथील सुप्रीम फायर वर्क्स चे प्रतिनिधी कार्तिकजी यांचा ही सन्मान करण्यात आले, या वेळी फटाका असोसिएशन चे माजी उपाध्यक्ष व भिंगार अर्बन बँकेचे जेष्ठ संचालक कैलास खरपुडे यांची अहमदनगर जिल्हा पतसंस्था फेडरेशन वर तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी असोसिएशन चे सर्व पदाधिकाऱ्यांचे ही सन्मान करण्यात आले. सन्मान शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेश जाधव यांनी केले तर श्रीनिवास बोज्जा यांनी प्रास्ताविक केले, अरविंद साठे यांनी आभार मानले. यावेळी फटाका व्यापारी असोसिएशन चे जेष्ठ सदस्य देवीदास ढवळे, माजी उपाध्यक्ष कैलास खरपूडे, सुनील गांधी, निखिल परभणे, संजय सुराणा, अमोल तोडकर, दाजी गारकर, संभाजी कराळे, विकास पटवेकर, विजय मुनोत, अनिल टकले, सागर हरबा, उबेद खान अविनाश जिंदम तसेच फटाका ग्राहक मोठया प्रमाणात उपस्थित होते.