बागडपट्टीतील त्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..२१ जण अटकेत..४ लाख ९३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील बागडपट्टी परिसरात सुरू असलेल्या तिरट (हारजिती) जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत २१ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून ४,९३,८८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,बागडपट्टी, ढोणे गल्ली (ता.जि. अहिल्यानगर) येथे जुन्या वाड्याच्या भिंतीच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित आहेत.सदर माहितीच्या आधारे सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना खात्री करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (सुपा पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार खंडेराव शिंदे,कल्याण लगड,सारंग वाघ,गणेश डोंगरे, प्रशांत दिवटे,योगेश सातपुते, विशाल कुलकर्णी यांनी बातमीतील ठिकाणी अचानक छापा टाकला.तेथे काही इसम पत्त्यांवर पैसे लावून हारजितीचा जुगार खेळताना आढळून आले.
पथकाने तात्काळ कारवाई करत खालील २१ इसमांना ताब्यात घेतले –
संजीव रामचंद्र राऊत (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर)
अमर रुपा छाडेकर (रा. पारधी, ता. जामनेर, जि. जळगाव)
गणेश प्रल्हाद चोभे (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर)
राहुल प्रकाट भट (रा. तेलीखुंट, ता. जि. अहिल्यानगर)
यशवंत पंढरीनाथ ढोणे (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर)
हेमंत गणेश गायकवाड (रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर)
समाधान श्रीमंत सुरवसे (रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड)
जिजाबा रखमाजी भोसले (रा. पांडे, ता. करमाळा, jि. सोलापूर)
अशोक विश्वनाथ चोभे (रा. केडगाव, ता. जि. अहिल्यानगर)
विशाल रोहिदास नाकाडे (रा. कोठी, माळीवाडा, ता. जि. अहिल्यानगर)
प्रेमशंकर गणेशलाल कश्यप (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर)
मोहन दत्तु गोरे (रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर)
सतीश परशुराम जेजुरकर (रा. लोंढे मळा, केडगाव, ता. जि. अहिल्यानगर)
अशोक बबन घोगरे (रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड)
तुषार अशोक लड्डा (रा. अडतेबाजार, ता. जि. अहिल्यानगर)
सुरज अशोक यादव (रा. भिसेगाव, ता. कर्जत, जि. रायगड)
श्रीमंत निवृत्ती सुरवसे (रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड)
जिशानखान मंजुरखान पठाण (रा. बेलदार गल्ली, ता. जि. अहिल्यानगर)
अमोल महादेव कांबळे (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
राजू रामदास जगताप (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
रिंटु नंदेलाल महातो (रा. विहार)
💰 ४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून एकूण ४,९३,८८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये रोख रक्कम, २० मोबाईल फोन व जुगार साहित्याचा समावेश आहे.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 83/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार सुपा,नगर तालुका, तोफखाना व पारनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या पार पाडली.पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर मोठा आळा बसणार असून परिसरात खळबळ उडाली आहे.
