विधीसंघर्षीत बालकांनी चोरलेले सोन्याचे दागीने,मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करण्यात तोफखाना पोलीसांना यश
अहिल्यानगर (दि.६ प्रतिनिधी):-विधीसंघर्षीत बालकांनी चोरलेले सोन्याचे दागीने व मोबाईल हॅण्डसेट तोफखाना पोलीसांनी तपास करत हस्तगत केले.
बातमीची हकीकत आशिकी,तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं 1189/2024 भारतीय न्याय संहिता कलम 331 (3), 305(ए) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, त्यांची पत्नी घराचे दोन्ही दरवाजे बंद करुन कुलुप लावुन परीक्षेचा फॉर्म भरण्या करीता दि.28 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास गेल्या व त्या फॉर्म भरुन परत आल्या असता त्यांना त्यांचे घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यामध्ये त्यांचा एकुण 48,000/-रु.किमतीचे सोन्याचे दागीने मोबाईल फोन चोरी गेल्याचे लक्षात आले मजकुराचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल केला होता.
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोनि.श्री.आनंद कोकरे यांनी तपास पथकास आदेश देवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना दिल्या त्यावरुन गोपनीय माहीती प्राप्त करुन सदरचा गुन्हा हा विधीसंघर्षीत बालकांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने यातील विधीसंघर्षीत बालकांचा शोध घेवुन त्यांनी गुन्हयात चोरलेले सोन्याचे दागीने व मोबाईल फोन असा एकुण 21,000/-रु. मुद्देमाल हस्तगत केला.पुढील तपास पोना.चांगदेव आंधळे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोनि.श्री.आंनद कोकरे यांच्या सूचनेनुसार पो.उपनिरी श्री.शैलेश पाटील, पोहेकॉ.दत्तात्रय जपेे, पोहेकॉ.भानुदास खेडकर,पोहेकॉ.अहमद इनामदार,पोहेकॉ.सुनिल शिरसाट,पोहेकॉ.सुरज वाबळे,पोहेकॉ.सुधीर खाडे,पोहेकॉ.गणेश धोत्रे,पोना.वसीम पठाण, पोकॉ.राहुल म्हस्के,पोकॉ.सुमीत गवळी, पोकॉ.शिरीष तरटे, पोकॉ.दत्तात्रय कोतकर, पोकॉ.सतीष भवर,पोकॉ.सतीष त्रिभुवन,पोकॉ.बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.