शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांची प्रचारफेरी संपन्न नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी
अहिल्यानगर (दि.६ प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा पोहोचली आहे.या यात्रेला प्रभागातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद भेटत असून संग्राम जगताप यांनी प्रभागातील संपूर्ण रस्ते खड्डे मुक्त करून काँक्रीट रस्ते तयार केले आहे.
त्यामुळे संग्राम जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यांनाच निवडून देणार असल्याची भावना प्रभागातील महिलांनी व्यक्त केली आहे.शहरात विकास कामांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी आ.संग्राम जगताप यांनी आणला आहे.
प्रत्येक प्रभागात दोन ते अडीच कोटींचे रस्त्याचे कामे तसेच ड्रेनेज लाईन चे काम चालू आहेत.आ.संग्राम जगताप यांनी गल्लोगल्लीत काँक्रीटचे रस्ते केले असून उत्तम दर्जाचे काँक्रीट रस्ते तयार केले आहेत त्यामुळे संग्राम जगताप यांना आता आमदार होऊन मंत्रीपद भेटो अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.