Maharashtra247

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद बीएसपीच्या उमेदवार कु.तायडे यांच्या प्रचारफेरीस महिलांची गर्दी

 

अमरावती प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीचे काही दिवस उरले असून उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी तसेच प्रचाराचा वेग वाढवला आहे.

फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या अमरावती शहर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टी कडून हत्ती या चिन्हावर उभ्या असलेल्या कु.मेघा तायडे यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली त्यांनी शहर अक्षरशा पिंजून काढले आहे.

यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.त्यांनी आज सिद्धार्थ नगर,गौतम नगर,सिंधी कॅम्प,डेबुजी नगर,अशोक नगर येथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन हत्ती चिन्हा समोरचे बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांचे या परिसरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

यावेळी उमेदवार कु.मेघा तायडे म्हणाल्या की मी राजकारण कमी व समाजकार्याकडे जास्त लक्ष देते.आणि माझा हा संपर्क जनतेशी फक्त निवडणुकीपुरता नसून तर कायम राहणार आहे.

You cannot copy content of this page