Maharashtra247

केडगावकरांना भावली संग्राम जगताप यांची विकासात्मक दृष्टीकोनाची साद… विकासासाठी पुन्हा संधी देण्यासाठी केडगावचे नागरिक एकवटले

 

अहील्यानगर प्रतिनिधी:-केडगावकरांना भावली संग्रामची विकासात्मक दृष्टीकोनाची साद… विकासासाठी पुन्हा संधी देण्यासाठी नागरिक एकवटले…केडगावच्या युवकांसह महिला वर्गाचा महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना प्रतिसाद…

पे रिक्षामध्ये बसून केला प्रचार तर थेट विट भट्टी गाठून कामगारांशी साधला संवाद….ज्येष्ठांनी देखील नगर विकास यात्रेचे स्वागत केले.महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.13 नोव्हेंबर) सकाळी रेणुकामाता मंदिर,केडगाव देवी रोड परिसरातून नगर विकास यात्रा काढण्यात आली.

यावेळी घराघरातून आ.जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. चौका-चौकात युवकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.तर आ. जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. आली.यावेळी लाडक्या बहिणींनी आपल्या भैय्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.तर स्वागताला आलेल्या महिलांशी आ.जगताप यांनी दिलखुलासपणे संवाद साधला.

You cannot copy content of this page