नगर शहरातील लाडक्या बहिणी आ.संग्रामभैय्यांच्याच पाठीशी..!आ.संग्राम जगताप यांना मतदान करण्या विषयी एकमत असल्याचा व्हिडिओ झळकतोय सोशल मीडियावर
अहिल्यानगर प्रतिनिधी:- नगर शहरामध्ये गेल्या दहा वर्षात आमदारकी भूषवितांना आ. संग्रामभैय्या जगताप यांनी माता-भगिनींच्या सुख-दुःखाची समरस होत निर्माण केलेल्या आपलेपणामुळे स्त्री शक्तीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुक प्रचारासाठी शहरात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांमध्ये आ.संग्रामभैय्या जगताप आल्याचे पाहून त्यांचे स्वागत करण्याकरिता स्वयंस्फूर्तीने पुढे येणाऱ्या भगिनींची लक्षणीय संख्या उत्साहवर्धक आहे.आपल्या प्रभागात आ.संग्रामभैय्यांचे आगमन होणार ही बातमी मिळताच आपल्या अंगणात सडा टाकत आकर्षक रंगीत रांगोळ्या काढणे.रांगोळ्यांच्या पायघड्या घालणे.ओवाळण्याची पूर्वतयारी करणे.सवाद्य स्वागताची व्यवस्था करणे.फटाक्यांच्या आतिषबाजीचे नियोजन करणे अशी एक ना अनेक कामांची लगबग सुरू होऊन महिलांची एकच लगबग होतांना दिसते.शहरात सुरू असलेल्या विकासकामांची महिलांमध्ये जोरदार चर्चा असून ही कामे पूर्णत्वास जाऊन पुढेही असा ठोस विकास होत रहावा,असे बोलले जात आहे.
आ.संग्रामभैय्या जगताप यांनी कोविड महामारीच्या काळात आपलेपणाने केलेली मदत महिलांनी जवळून पाहिली आहे.आपली रक्ताची नातीही कोरोना काळात पुढे येत नव्हती तेथे आ.संग्रामभैय्या कोरोनात न डगमगता आपलाच परिवार समजून पोहोचत राहिले. त्यामधून ते नगरकरांचे झाले.त्याचे फलित म्हणून ही निवडणूक शहरातील महिलांनी हाती घेऊन आ.संग्रामभैय्या जगतात यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे दिसत आहे.आ.संग्रामभैय्यांना निवडून आणण्यासाठी शहराच्या सर्वच भागामधील महिलांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.साडी खरेदीसाठी दुकानात गेलेल्या सासु सुनांचे खरेदी करताना एकमत होत नाही मात्र आ.संग्रामभैय्या जगताप यांना मतदान करण्या विषयी एकमत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आहे.
ही जाहिरात महिलांमध्ये कौतुकाचा विषय झाली आहे.आ.संग्रामभैय्या यांनी केलेली कामे आणि त्यांच्या पाठीशी स्त्रीशक्ती संघटन कसे उभे राहते? हे सासु -सुना सांगताना पाहून घराघरातील महिलांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.एकूणच ही निवडणूक महिलांनीच हाती घेतली आहे.