सारसनगरमध्ये घराघरातून महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांचे स्वागत
अहिल्यानगर प्रतिनिधी:-सारसनगरमध्ये घराघरातून महायुतीचे उमेदवार जगताप यांचे स्वागत झाले.महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) प्रभाग क्र.11 मधील सारसनगर परिसरातून नगर विकास यात्रा काढण्यात आली.
यावेळी घराघरातून आ. जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.आ.जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या व ज्येष्ठांचा आशिर्वाद घेतला.
तसेच हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे एकनिष्ठ शिवसैनिक,बुरुडगावचे तत्कालीन माजी नगरसेवक स्व.अरूणभाऊ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आ.संग्राम जगताप यांनी नुकतीच बुरूडगाव येथे जावून शिंदे कुटुंबियांची भेट घेतली.यावेळी शिंदे कुटुंबीयांनी आ.जगताप यांचे औक्षण करून स्वागत केले.तसेच जगताप यांनी स्व. अरूणभाऊ शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादनही केले.यावेळी संजय शिंदे आम्हीं पक्ष आणि राजकारण या पलीकडे कौटुंबिक मैत्री संबंध जपत आ.संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.जगताप आणि शिंदे परिवाराचे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणा पलीकडे कौटुंबिक मैत्री संबंध आहेत.त्यामुळे परिवारातील सदस्य मैदानाच्या रिंगणात उतरल्यानंतर त्याच्या पाठीशी सर्व परिवार उभे राहणे हे आमचे संस्कार आणि कर्त्यव्य आहे. याची जाणीव ठेवून सर्व शिंदे कुटुंबाने एकत्र येत आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी जाहीर खंबीरपणे उभे राहून बुरुडगाव प्रभागातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.