सच्चा साथी हमारा हाथी;बसपा उमेदवार मेघा तायडे यांच्या पदयात्रेचे विविध ठिकाणी स्वागत; मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
अमरावती प्रतिनिधी:-विधानसभेची निवडणूक जशीजशी जवळ येऊ लागली आहे तशी तशी रंगत वाढू लागली आहे.
अमरावती शहर विधानसभा मतदारासंघांत बसपा उमेदवार मेघा तायडे यांची पदयात्रा छत्रसाल नगर,खरैय्या नगर,अमरनगर,नरेडी नगर,शोभा नगर,जयसियाराम नगर याठिकाणी संपन्न झाली.
या पदयात्रेचे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले.या परिसरातील बहुजन समाजातील विविध जातीधर्माच्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात मेघाताईच्या पदयात्रेमध्ये सहभागी होवून मेघाताईला निवडून आणण्याचा संकल्प केला.उमेदवार मेघा तायडे यांच्या प्रचारार्थ गवळीपूरा,कुरैशी मोहल्ला,याठिकाणी बहुजन समाज पार्टी विधानसभा प्रमुख चंद्रमणी डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री.अमरदिप सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर मिटिंग संपन्न झाली यावेळी चंद्रमणी डोंगरे यांनी ‘सच्चा साथी हमारा हाथी’ नारा देत हत्ती चिन्हा समोरील बटन दाबून मेघाताई तायडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे नागरिकांना आवाहन केले.या सभेला पक्षाचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये राष्ट्रपाल दंदे,वायएम रामटेके,जुम्मन चावरे यांच्यासह अनेक मुस्लिम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.