Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ ची मोठी कारवाई

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभा आचारसंहितेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.१ यांनी नगर मनमाड रोड लगत राहुरी येथे कारवाई करत विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करत एकूण ५०,४८८० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी सतीश अण्णासाहेब ढवळे रा.वांबोरी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई डॉ.विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य,श्री.प्रसाद सुर्वे सहआयुक्त महाराष्ट्र राज्य,श्री.सागर धोमकर विभागीय उपआयुक्त पुणे विभाग,श्री. सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी अहिल्यानगर,श्री.प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर,श्री.प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरज कुसळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर भरारी पथक क्र.१,श्री.आनंद जावळे दुय्यम निरीक्षक, श्री.विनोद रानमाळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक,जवान श्री. देवदत्त गदरे,चतुर पाटोळे,सिद्धांत गिरी गोसावी, वाहन चालक डी.आर.बर्डे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page