महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या सावेडी उपनगरातील प्रचार रॅलीत नागरिकांचा स्वयंफुर्तीने सहभाग;संग्राम भैय्यांच्या विजयासाठी सुजय दादांची मिठी.प्रचाराची हलगी कडाडली…
अहिल्यानगर प्रतिनिधी:-उपनगराच्या विकासात्मक कामातून महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत स्वयंफुर्तीने सहभागी झाले होते.
महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.11 नोव्हेंबर) पाइपलाईन रोड, शीला विहार चौक, श्रीरामचौक आदी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. उपनगरात निघालेल्या प्रचार रॅलीस नगरकरांचा उत्साह दिसून आला. तर जेसीबीद्वारे हलगीच्या निनादात फुलांचा वर्षाव करण्यात आला. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाल्या होत्या. प्रचारासाठी आलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जगताप यांची गळाभेट घेतली. यावेळी पाईपलाईन रोड परिसरात नागरिकांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.