सामाजिक कार्यकर्ते शेखर तुंगार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरज शिंदे,मा.नगरसेवक मनोज दुलम यांच्या प्रयत्नांना यश,परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाईलाईनरोड येथील हनुमान नगरमध्ये काल झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने खूप मोठे नुकसान झाले असून सकाळपासून लाईट गेली होती.
तसेच एमएसईबी च्या पोलवरून आलेल्या तारांवर एक भले मोठे झाड कोसळलेले होते यामुळे परिसरातील लाईट खंडित झाली होती.सकाळपासून स्थानिक रहिवाशांनी नागरिकांनी महानगरपालिका व एमएसईबी च्या कर्मचाऱ्यांना कॉल करून माहिती दिली असता त्यांची कोणतीही दखल घेतली नव्हती.संबंधित कार्यालयाकडून टाळाटाळ करण्यात येत होती.यामुळे येथील नागरिकांनी एमएसईबी व महापालिकेच्या कामकाजावर संतप्त होत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शिंदे,भाजपचे मा.नगरसेवक मनोज दुलम व सामाजिक कार्यकर्ते शेखर तुंगार यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली,क्षणाचा विलंब न करता सुरज शिंदे व मनोज दुलम यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांकडून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन एमएसईबी च्या अधिकाऱ्यांना त् कॉल करून व लोकांचा रोष पाहता घडलेल्या परिस्थितीची माहिती दिली.
तात्काळ एमएसईबी चे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी तारेवर पडलेले झाड बाजूला केले व लाईट पूर्ववत चालू केली.सुरज शिंदे मा. नगरसेवक मनोज दुलम व शेखर तुंगार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये एक समाधानाचे आनंदाचे वातावरण तयार झाले.