भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील ‘ते’ दोन गुन्हेगार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने गुंड/गुन्हेगार यांच्या अभिलेखावरून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव सादर केले होते.
मोईन बादशहा शेख (रा.मुकुंदनगर, अहिल्यानगर) व सरवर उर्फ भिम्या अस्लम शेख (रा.झेंडीगेट अहिल्यानगर) या दोघांना 6 महिन्याकरिता जिल्ह्याच्या सरहद्दी बाहेर हद्दपार केल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी दिला.

दिलेल्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी या दोघांना जिल्ह्याच्या सरहद्दी बाहेर सोडले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,महिला पोलीस अंमलदार रेखा पुंड,दीपक शिंदे, रवी टकले,सतीश थोरात,प्रमोद लहारे,संदीप घोडके,समीर शेख यांनी केली आहे.