Maharashtra247

एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात,दोन शिक्षक जागीच ठार,तर एक शिपाई गंभीर जखमी

 

पारनेर प्रतिनिधी (दि.१८ फेब्रुवारी):-नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील धोत्रे गावच्या शिवारात शेख वस्ती नजीक एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये दोन शिक्षक जागीच ठार,तर एक शिपाई गंभीर जखमी झाला आहे.शुक्रवारी (दि.१७) फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला.हा अपघात एवढा भयानक होता की,कारचा अक्षरशःचक्काचूर झाला.अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,मुरबाड आगाराची एसटी बस (क्र.एम.एच.२० बी.एल.२४५७) ही कल्याणहून अहमदनगरकडे जात असताना धोत्रे गावच्या शेख वस्ती नजीक अहमदनगरहून आळे फाट्याकडे जाणाऱ्या कार (क्र.एम.एच.१७ ए.झेड, ३४९१) यांची समोरासमोर धडक अपघातानंतर कारमधील कळंब (ता. (अकोले) येथील विद्यालयाचे सहायक शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर (वय ५१, रा. शिवलीला,अमृत पेठ नारायणमळा,नारायणगाव) व कोतूळ ता.अकोले येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव दादाभाऊ बर्वे (वय ५२,रा. कोतूळ,ता.अकोले) हे जागीच ठार झाले.अविनाश कुंडलिक पवार शिपाई हा गंभीर जखमी झाला.पुढील तपास पारेनरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बी.बी. भोसले,श्रीनाथ गवळी,रवींद्र साठे आदी करत आहेत.

You cannot copy content of this page