काकनेवाडी येथे शिवजयंती विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरी;शिवजयंतीचे औचित्य साधून गावातील तरुण घेणार व्यसन मुक्तीची शपथ
पारनेर प्रतिनिधी (दि.१७ फेब्रुवारी):-तालुक्यातील सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या काकनेवाडी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही 10 व्या वर्षी शम्भूराजे मित्र मंडळ,निलेश लंके प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.दि.18/02/2022रोजी रात्री गावातील युवक शिवजन्म स्थळ किल्ले शिवनेरी येथे शिवज्योत आणण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.जयंतीदिनी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, गुणवन्त विद्यार्थांचा,तसेच मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षक,तबला वादनामध्ये ज्यांच्या विद्यार्थ्यांची दुबई येथील स्पर्धेत निवड झाली होती असे या गावचे भूमीपुत्र रामदास ठुबे आणि त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन शंभुराजे मित्र मंडळ व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येणार आहे.तसेच वैद्यकीय आणी पशुवैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान यावेळी काकनेवाडी ग्रामस्थ आणी मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.नंतर मनोहर डोळे नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वानी या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान मंडळाचे अध्यक्ष गवरामशेठ वाळुंज यांनी केले आहे.शिवजयंती निम्मित राणीताई निलेश लंके (जि.प सदस्य ),विजुभाऊ औटी(नगराध्यक्ष,पारनेर),उमाजी भागुजी वाळुंज (उपसभापती प.स.पारनेर),डॉ.देठे.(वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र अळकुटी),शिवाजी ना.वाळुंज (मा.शिक्षण वि.अधिकारी),सूर्यकांत बबन पवार (पश्चिम मुंबई अध्यक्ष भाजपा),हभप दादाभाऊ महाराज वाळुंज, सखाराम सर (मुंबई),शिवाजी ना.वाळुंज (मा.शिक्षण वि.अधिकारी)डॉ.सोबले यांची प्रमुख उपस्थिती राहील अशी माहिती शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष राहुल वाळुंज यांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पवार वस्ती येथे शंभूराजे राजे मित्र मंडळ व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.संध्याकाळी भव्य मिरवणूक, प्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल शिंदे (गुरुजी) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.व्याख्यान संपल्या नंतर महाप्रसाद असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक हभप. रंगनाथ महाराज वाळुंज यांनी दिली.