आदिवासी मुला-मुलींची सायबर पोलीस स्टेशनतर्फे सायबर जनजागृती
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१७ फेब्रुवारी)आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे दि.१७ फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस स्टेशन तर्फे सायबर जनजागृती करून विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले.आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात असे प्रतिपादन सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी यावेळी केले.स्मार्टफोन व सोशल मीडिया हे सायबर फसवणुकीचे मूळ आहे.त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना अतिशय सतर्क रहावे.बँक महावितरण फोनपे, गुगलपे,ॲमेझॉन,आर्मी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांना आपल्या बँकेची, एटीएमची,क्रेडिट कार्डची माहिती किंवा ओटीपी देऊ नये.तसेच त्यांच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये.अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा आर कोड स्कॅन करू नये. ओएलएक्स,फेसबुक, इंस्टाग्राम,क्विकर यासारख्या सोशल मीडिया साईट वरून अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये,त्यांना पैसे पाठवू नये.शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी लोभापोटी अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवू नयेत.लोन ॲप वरून लोन घेणे टाळावे.या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत.फेसबुक, इंस्टाग्राम,जीमेल, व्हाट्स अॅपमध्ये टू स्टेप वेरिफिकेशन ही सेटिंग करून आपले सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग होण्यापासून वाचवता येऊ शकते. याचबरोबर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत.आदी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना श्री.रणशेवरे व अभिजीत अरकल यांनी यावेळी केल्या.यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे पोना/अभिजीत अरकल यांनी सायबर फसवणूक कशाप्रकारे होते याची अनेक उदाहरणे देऊन यापासून कसे वाचावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अनोळखी व्यक्तींच्या मागणीवरून कधीही ओटीपी शेअर करू नये.सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींच्या मोहाला बळी पडू नये. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा याचबरोबर आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी. तसेच https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तात्काळ ऑनलाईन तक्रार नोंदवावी इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती श्री.अभिजित अरकल यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाला कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक सचीन रनशेवरे,पोलीस नाईक अभिजीत अरकल,पोलीस अंमलदार राहुल गुंडू,मनाली उदास म्याडम,शेळके सर,व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.