अहिल्यानगर (दि.२५ प्रतिनिधी):-शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी मैदान येथे नायलॉन मांजाची विक्री चालू आहे अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोनि. दराडे यांनी गुन्हे शोध पथकास याची माहिती देऊन खात्री करून कारवाई करण्यास सांगितले.
गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक संशयित इसम त्याच्या ताब्यात गोणी घेऊन उभा होता.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात नायलॉन मांजाचे 70 बंडल आढळून आले.त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने आकाश रवी केळगांद्रे असे सांगितले.पोकॉ.सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ.संदीप पितळे,मपोहेकॉ.दरंदले,दीपक रोहकले,तानाजी पवार,सुजय हिवाळे,सुरज कदम,अनुप झाडबुके,राम हंडाळ,संकेत धीवर यांनी केली आहे