अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):-स्नेहालय संस्थेचे २०२४-२५ चे बा-बापू आणि विनोबा राष्ट्रीय सेवा पुरस्कार सौ.हेमंती पॉल सरकार (संस्थापिका-ईश्वा फाउंडेशन,हैदराबाद, तेलंगणा),श्रीमती आरती कुमारी.संचालिका – ब्रेकथ्रू संस्था,दिल्ली – हरियाणा) आणि संजय दालमिया (संस्थापक -ओपन लिंक फाउंडेशन आणि विनोबा ॲप, पुणे) यांना जाहीर झाले आहेत.येत्या शनिवारी दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण स्नेहालय पुनर्वसन संकुल एमआयडीसी येथे होणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने समर्पित सेवाव्रतींशी संवादाची संधी सर्वाँना मिळेल.विकसित तंत्रज्ञानाच्या उपयोगातून जनसामान्यांचे आयुष्य निरामय आणि सुखकर करण्यासाठी भारतात पथदर्शी काम वेंचर सेंटर हा उपक्रम करीत आहे. त्याचे संस्थापक डॉ.व्ही. प्रेमनाथ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अमेरिकेतील एमआयटी येथून विद्यावाचस्पती पदवी संपादन केल्यावर वैश्विक उद्योग जगतात त्यांनी स्वतःला सिद्ध केले.मागील दीड दशकापासून भारतात वेंचर सेंटर स्थापित करून राष्ट्रनिर्माणात ते योगदान देत आहेत.स्नेहालय संस्थेच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा आज संस्थेच्या आणि पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा श्रीमती जया जोगदंड, राजीव गुजर, राजीवकुमार सिंह,डॉ. प्रीती भोंबे,अनिल गावडे आणि भूषण देशमुख यांनी केली.स्नेहालय संस्था सामाजिक क्षेत्रातील समर्पित कार्यकर्त्यांना आणि संस्थांना वर्ष १९९५ पासून बहुविध पुरस्कार देते.संस्थांच्या कार्याला समाज मान्यता,बहुविध स्वरूपाचे पाठबळ मिळवून देणे आणि परस्पर सहकार्याचे कार्यजाळे निर्माण करण्याचा यामागे उद्देश असतो.२०२० पासून बा,बापू आणि बिनोबा पुरस्कार संस्थेचे विश्वस्त किरिटी शामकांत मोरे आणि सौ.भारती मोरे ( पुणे ) यांनी संस्थेस आर्थिक सहयोग देऊन सुरु केले.
या तिन्ही पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष आहे.रुपये ५० हजार, सन्मानपत्र स्मृतीचिन्ह, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या निमित्ताने स्नेहालय आपले देणगीदार आणि कार्यकर्ते या सन्मानित संस्थांशी स्थायी स्वरूपात जोडते.
निकष आणि निवड
बा पुरस्कार हा सेवाव्रती श्रीमती सीताबाई मांढरे यांच्या स्मृती निमित्ताने, बापु पुरस्कार हा स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार श्यामकांत दामोदर मोरे यांच्या स्मृती निमित्त आणि विनोबा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील शिक्रापुरचे आदर्श माजी सरपंच कै.रावसाहेब पाटीलबुवा मांढरे यांच्या स्मृती निमित्त दिला जातो.बा पुरस्काराकरीता निवडलेल्या सौ.हैमंती पॉल सरकार यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आपली नोकरी १२ वर्षांपूर्वी सोडली.स्नेहालयच्या बालभवन या झोपडपट्टीतील मुलांसाठीच्या प्रकल्पातून प्रेरणा घेत हैदराबाद येथील सरकारी शाळांमधील ९ ते २१ वयोगटातील २५०० विद्यार्थ्यांसोबत कार्य सुरू केले.त्यांचे शिक्षण आनंददायी करणे,विविध कला- क्रीडा आणि रोजगार कौशल्यांची जोड त्यांच्या शिक्षणास देणे त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे यासाठी १६ परिवर्तन केंद्र स्थापन केली.या कामी सुमारे २०० स्वयंसेवी कार्यकर्त्यांना जोडून प्रेरक काम उभे केले.
बापु पुरस्कार घोषित झालेल्या आरती कुमारी मूळ बिहार येथील आहेत.झारखंड, मध्यप्रदेश,छत्तीसगड , गुजरात आणि बिहार येथे शेतकरी,आदिवासी आणि ग्रामीण महिलांच्या हक्करक्षण आणि सक्षमी करणासाठी प्रदान आणि ऑक्सफॅम इंडिया या संस्थांमधून त्यांनी दीड दशक काम केले. सध्या त्या हरियाणा राज्य आणि दिल्ली परिसरातील किशोरवयीन मुला – मुलींच्या शैक्षणिक, मानसिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ब्रेक थ्रू,या संस्थेच्या उपक्रमांचे संचालन करतात.विनोबा पुरस्कारासाठी निवडलेल्या ओपन लिंक फौंडेशनचे संस्थापक संजय दालमिया आयआयटी आणि आयआयएम या संस्थांचे अव्वल विद्यार्थी ठरले.२५ वर्षे अमेरिकेत संगणक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्यावर सामाजिक ध्येय मनाशी बाळगून भारतात परतले.भारतातील बहुसंख्य बालकांना सरकारी शाळांमधून शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही.परंतु या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता आजवर सातत्याने अपयशच आले.याकामी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत व्यापक सर्वेक्षण,प्रयोग आणि संशोधन श्री.दालमिया यांनी केले.२०१७ पासून सरकारी शाळांसोबत त्यांनी थेट काम सुरू केले.महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात विशेषत:जिल्हा परिषदेच्या शाळांशी संलग्न शिक्षकांसाठी त्यांनी विनोबा ॲप उपलब्ध करून दिले. त्याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले.या ॲपमुळे विविध अहवाल आणि माहिती पाठवण्यासाठीचा शिक्षकांचा ७० टक्के वेळ वाचू लागला. सरकारी शाळांमधून गुणवत्तायुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रकाशवाट विकसित झाली.तामिळनाडू आणि अन्य काही राज्यांनी विनोबा ॲपच्या वापराबाबत गांभीर्यपूर्वक काम सुरू केले आहे.
हा कार्यक्रम Snehalaya Ahmednagar is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: BA-BAPU & AWARDS
Time: Dec 28, 2024 05:00 PM India
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89652526677?pwd=0a5mc5Nask27Qog8adWAAAWTvsCt63.1
Meeting ID: 896 5252 6677
Passcode: 256823
या लिंक वर ऑनलाईन देखील पाहता येईल.अधिक माहितीसाठी ७७७००२७५०५ येथे संपर्काचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आपला विश्वासू,संतोष धर्माधिकारी समन्वयक
७७७००२७५०५