देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-मागील रविवारी निर्माल्य नदीपात्रात विसर्जित करीत असतांना ३० फूट उंचीच्या पुलावरून एक महिला नदीपात्रात पडली होती त्या वेळी महिलेचा पती सोबत होता.ती महिला नदीपात्रात पडल्यानंतर तिच्या पतीने शिरपूर होरे या गावात जाऊन घडलेली घटना ग्रामस्थांना सांगून माझ्या पत्नीला शोधून काढायला मदत करा अशी विनंती केली ही सर्व घटना ऐकून शिरपूर होरेच्या ग्रामस्थांनी तिच्या पतीला घेऊन नदीकडे धाव घेतली रात्री १० वाजताच्या दरम्यान काळोख्याच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशाने त्या महिलेला शोधण्यास सुरुवात केली”ज्याला देव तारी त्याला कोण मारी”असे म्हणण्यास हरकत नाही,ती महिला एका लाकडी खोड च्या साह्याने नदीपात्रात पकडून जीवित दिसून आली नंतर ग्रामस्थांनी एका बोटच्या सहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढले आणि सुटकेचा श्वास सोडला.सदर महिला ही निलम कैलास नागपुरे वय ३२ वर्ष रा.सुभाष नगर नागपूर व तिचे पती कैलास गोपाल नागपुरे रा.सुभाष नगर नागपूर हे दोघे व ४ वर्षाचा त्यांच्या मुलगा आयान हे नागपूर वरून आपल्या चार चाकी वाहनाने यवतमाळ जिल्ह्यातील एका मंदिरात नवस फेडण्याकरिता गेले होते व यवतमाळ वरून परत येताना निर्माल्य नदीपात्रात विसर्जन करण्याकरिता शिरपूर होरे गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावर रात्री थांबले होते. माझी पत्नी निर्माल्य नदीपात्रात टाकतांनी तोल न सांभाळल्यामुळे नदीपात्रात पडली असे पती कैलास गोपाल नागपुरे याचे म्हणणे होते.परंतु त्याची पत्नी नीलम कैलास नागपुरे घटनेच्या दोन दिवसा नंतर देवळी पोलीस स्टेशन मध्ये येऊन पती विरोधात तक्रार दाखल केली की माझ्या चरित्रावर संशय घेऊन माझ्या पतीनेच मला धक्का देऊन नदीपात्रात ढकल्ले यावरून देवळी पोलिसांनी पत्नीला जिवीने मारण्याच्या प्रयत्न केल्यामुळे विविध गुणांच्या अंतर्गत कारवाई केली असून आरोपी कैलास गोपाल नागपुरे याला अटक केली आहे.पुढील तपास देवळीचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या नेतृत्वात देवळी पोलीस करीत आहे.
