Crime..माजी महापौरावर अत्याचाराचा गुन्हा जिल्ह्यात खळबळ..! नोकरीच्या आमिषाने तरुणीचा छळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार,शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर अहिल्यानगर शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीनुसार,आरोपी वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडत असे व तिला तासनतास मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
