Crime..चोरीची संत्री विक्रीपूर्वीच पोलिसांचा सापळा;टेम्पोसह मुद्देमाल जप्त..नगर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्याच्या शेतातील संत्री चोरून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री नगर तालुका पो.स्टे.हद्दीत (दशमीगव्हाण ता. जि.अहिल्यानगर) गावचे शेतकरी नामे पोपट पांडुरंग म्हस्के,रा.उककडगाव ता.जि. अहिल्यानगर यांनी त्यांच्या शेतातील संत्री विक्रीसाठी 110 मोकळे कॅरेट शेतात ठेवले होते. दि. 20/02/2026 रोजी सकाळी 06.00 वाजण्याच्या सुमारास शेतात गेले असता 12 मोकळे कॅरेट शिल्लक होते. उर्वरित 98 कॅरेट व संत्र्यांचे झाडांवरील फळे दिसून आली नाहीत.तसेच शेतात टेम्पोचे टायरमार्क दिसून आल्याने अज्ञात चोरट्यांनी संत्री चोरून नेल्याची खात्री झाली.याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे 1,20,000/- रु.किमतीची संत्री व 4,900/- रु.किमतीचे कॅरेट चोरीस गेल्याबाबत गुन्हा रजि.नं. 105/2026 भा.दं.वि. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तपासा दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्हा हा इरफान बाबा शेख,रा.निम्बोडी ता.जि.अहिल्यानगर व त्याच्या साथीदारांनी केला असून,सध्या इसम हा शेंडी ता. जि. अहिल्यानगर येथे संत्री विक्री करण्यासाठी गेला आहे.
त्यानुसार नगर तालुका पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नामे इरफान बाबा शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2,00,000/- रु. किमतीचा टेम्पो, 1,16,800/- रु. किमतीची संत्री व 3,650/- रु. किमतीचे कॅरेट असा एकूण 3,20,450/- रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे,पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,शैलेश सरोदे,महेश भवार,नितीन शिंदे,सुभाष थोरात,मंगेश खरमाळे,रघुनाथ कुलंगे,विक्रांत भालसिंग,विकास शिंदे यांनी केली आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून,पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
