Crime..कोयत्याच्या धाकाने दहशत माजवून जबरी लुटमार करणारी टोळी अखेर जाळ्यात..नगर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी..! तिघे जेरबंद मात्र भोऱ्या फरार
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कामरगाव शिवारात कार अडवून कोयत्यांचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल, चाकू-कोयते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
📍 घटनेचा थरार
दि. २१/०२/२०२६ रोजी कोथळ, ता. माजलगाव, जि. बीड येथील बाळासाहेब काशिनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम हे रेनॉल्ट कारने जात असताना कामरगाव शिवारातील हॉटेल गुरुदत्त जवळ रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली.
आरोपींनी हातात कोयते व चाकू घेऊन फिर्यादी व त्यांच्या साथीदारास शिवीगाळ करत मारहाण केली. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या डोक्याला मार लागून अपघात झाला.
आरोपींनी –
रु. १८,०००/- रोख रक्कम
रु. ५०,०००/- ऑनलाईन ट्रान्सफर
रु. ४७,०००/- किमतीचे मोबाईल व चार्जर
तसेच इतर वस्तू
असा एकूण रु. १,१५,०००/- किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
👮 पोलिसांची वेगवान तपास मोहीम
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे खालील आरोपींना अटक करण्यात आली –
तुषार विजय उमाप
बुद्धभूषण संतोष आंग्रे (रा. दैठणे गुंजाळ, पारनेर)
तेजस लक्ष्मण उगलमुगले
तसेच गुन्ह्यातील आणखी एक आरोपी भोरया उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (फरार) याचा शोध सुरू आहे.
🕵️ पूर्वीचे गुन्हेही उघड
तपासादरम्यान आरोपींनी नगर तालुका हद्दीत अशाच प्रकारे कोयत्याचा धाक दाखवून लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी चास घाटात मध्यरात्री गाडी अडवून सोने-चेन व मोबाईल लुटल्याची माहितीही समोर आली आहे.
👏 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीश वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, विक्रांत भालसिंग, तसेच मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांनी केली आहे.
