Crime..तोफखान्यात दुसरी तक्रार दाखल माजी महापौर अभिषेक कळमकरांच्या अडचणीत वाढ..!पहिल्या गुन्ह्यानंतर कळमकर बेपत्ता..पक्षाची अद्याप कारवाई नाही
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.कळमकर यांच्याविरुद्ध आणखी एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली असून ही तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.मात्र,या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
दरम्यान,कळमकर यांच्या विरोधात यापूर्वीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका महिलेवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे.पहिला गुन्हा नोंद झाल्यापासून कळमकर बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. झालेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.सध्या पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
